गणपत गायकवाड यांच्या टीकेला श्रीकांत शिंदेचं प्रत्युत्तर

आता नवा वाद सुरू झालाय आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. शिंदे यांनी कोण कुठून कुठला पक्षातून उभं राहायचं हे ठरवण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत.

    कल्याण : काही वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतले पाहिजेत, त्याच्या अगोदर पण खूप वक्तव्य झालेत मात्र त्याच्यावर काही जणांना रिवर्स फिरावं लागलं. अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना टोला लगावला. भिवंडी आणि कल्याण मध्ये भाजपच्या उमेदवार निवडून येणार चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी असे वक्तव्य केले होते.

    कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर भाजपचे उमेदवार विजयी होतील असा दावा भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. राजस्थान मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर कल्याण पूर्वेत भाजपने विजय साजरा केला यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी हा दावा केला होता हा जग जाहीर आहे की भाजप आमदार गणपत गायकवाड प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करतात. कल्याण पूर्व येथील विकास काम कोणी थांबवला आहे. अप्रत्यक्षरीत्या भाजप आमदार वेळोवेळी बोलतात. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात विशेषकर डोंबिवली आणि कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर देखील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय स्थापित करण्याच्या प्रयत्न झाला परंतु त्याच्या काही परिणाम होताना दिसत नाहीये.

    आता नवा वाद सुरू झालाय आमदार गणपत गायकवाड यांच्या वक्तव्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. शिंदे यांनी कोण कुठून कुठला पक्षातून उभं राहायचं हे ठरवण्यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. जोपर्यंत आपण तसे वक्तव्य करणार नाही तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही आणि काही वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतले पाहिजेत त्याच्या अगोदर पण खूप वक्तव्य झालेत मात्र त्याच्यावर काही जणांना रिवर्स फिरावं लागलं. कोणी टीका केली म्हणून त्याच्यावर टीका करणार इतका वेळ माझ्याकडे नाही, ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांसाठी काम केलं पाहिजे ज्यांच्याकडे काही सांगायला नसेल, बोलायला नसेल त्यांना हे सगळे उद्योग असतात मला खूप काम आहेत असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांना लगावला.