Ganpat Gaikwad remanded to police custody till February 14; What exactly happened during the hearing; Read the detailed report

पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख, तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोरच हा गोळीबार झाल्याचे बोललं जात आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

    या प्रकरणानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. म्हणूनच मी गोळीबार केला”, असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.

    “जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही”, असंही आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

    आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असं गायकवाड म्हणाले.