BJP MLA from Satara Jayakumar Gore has been charged with atrocity

मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे(BJP MLA Jayakumar Gore's difficulty increases).

    मुंबई : मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे(BJP MLA Jayakumar Gore’s difficulty increases).

    मात्र, आमदार गोरे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास न्या. अनिल मेनन आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने नकार दिला आहे. पुढील सुनावणी 17 मे रोजी निश्चित केली.

    मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय घुटूगडे, महेश बोराटे व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकरला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.