adipurush-ram-kadam

राम कदम यांनी ट्वीटमध्ये (Ram Kadam Tweet) लिहिलं, “आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसिद्धीसाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.”

    आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटावर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी टीका केली आहे. ‘हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.’ असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

    राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसिद्धीसाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.”

    ते पुढे ट्विटमध्ये लिहितात की,“चित्रपटातले सीन कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बंदी घातली पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही.”

    आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमधील व्हिएफएक्स आणि सैफच्या लूकवरून सध्या ट्रोलिंग सुरु आहे. आता भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितल्याने चित्रपटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.