bjp mp dr heena gavit injured in accident in nandurbar the car dash to divider nrvb

Heena Gavit: खासदार डॉ. हीना गावित यांची गाडी दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना आज दुपारी (दि.७ ऑगस्ट २२) दुपारी नंदुरबारात घडली. दुचाकीस्वार महिलेला वाचविताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.

    नंदुरबार : दुचाकीस्वार महिलेला वाचविताना खासदार डॉ. हीना गावित (Heena Gavit) यांची गाडी दुभाजकाला धडकल्याने (Accident) त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह तीनजण जखमी झाल्याची घटना आज दुपारी (दि.७ ऑगस्ट २२) दुपारी नंदुरबार (Nandurbar) येथे घडली. खासदार गावित (MLA Gavit) यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ.हीना गावित या आपल्या गाडीने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास नंदुरबार येथील एका कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला.

    नंदुरबार शहरातील करण चौफुली जवळ असलेल्या देवचंदनगर जवळील रस्त्याने त्या जात असताना त्यांच्या वाहनासमोर अचानक दुचाकीस्वार महिला आली. चालकाने महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता डॉ. गावित यांची गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात खासदार गावित यांना हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

    दुचाकीस्वार महिला देखील जखमी झाली. स्वत: खासदारांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला रुग्णालयात पाठवत तिला धीर दिला. त्यानंतर खासदार व त्यांच्या सोबत असलेले रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुभाष पानपाटील हे स्वत: खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.