आरक्षणावर भाजप नेते नारायण राणेंची नाराजी; पोस्ट शेअर करत केले स्पष्ट

जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत महायुती सरकारला सुवर्णमार्ग काढण्यात यश आले आहे. मात्र यावर भाजप नेते नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तीव्र आंदोलन उभे केल्यानंतर लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला. लाखो लोक मुंबईच्या दिशेने येण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने (State Govt) सगेसोयरे शब्दांसह जीआर काढला. यामुळे जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत महायुती सरकारला सुवर्णमार्ग काढण्यात यश आले आहे. मात्र यावर भाजप(BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली नाराजी जाहीर केली आहे.

    महायुती सरकारने जीआर काढत दिलेल्या आरक्षणावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. सरकरामध्ये सामील असलेल्या अनेक नेत्यांनी या आरक्षणावर नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये आता भाजप नेते नारायण राणे यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांचा देखील समावेश असणार आहे. नारायण राणे यांनी आपल्या ऑफिशियल अंकाऊंटवर याची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

    भाजप नेते नारायण राणे म्हणाले, “मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन,” अशी माहिती नारायण राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.