nadda modi and shah

सध्या जे.पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. खासदारांनी मतदारसंघात कशी कामे केलीच याचा आढावा घेतला जाणार आहे, यानंतर त्यांना तिकिट द्यायचे की नाही हे ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या  भाजप खासदारांची कामगिरी चांगली नाहीय, त्यांचे तिकिट कापले जाणार आहे.

    मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी आत्तापासून सर्वंच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर याच पार्श्वभूमीवर विविध पक्षातून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाकडून आमदार किंवा खासदार यांच्या कामांचा आढावा घेतला जातो. त्यांचे मतदारसंघातील कामगिरी कशी आहे, यावर त्यांच्या तिकिट निकष यावेळी अवलंबून असणार आहे. (bjp non performing mp will be cut tickets for the lok sabha elections did know reasons)

    नॉन परफॉर्मन्स खासदारांचे पंख छाटणार

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून प्रत्येक खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले होते. यानंतर राज्यातील काही खासदारांवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जात होतं. सध्या जे.पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. खासदारांनी मतदारसंघात कशी कामे केलीच याचा आढावा घेतला जाणार आहे, यानंतर त्यांना तिकिट द्यायचे की नाही हे ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या  भाजप खासदारांची कामगिरी चांगली नाहीय, त्यांचे तिकिट कापले जाणार आहे, त्यामुळं त्यांना धोक्याची घंटा असल्याची शक्यता आहे. अशी सुत्रांची माहिती आहे.

    लोकसभेसाठी भाजपकडनव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू झालेली आहे. तर भाजपकडून मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जे.पी नड्डा आणि अमित शाह यांच्या दौऱ्यात भाजप खासदारांच्या कामगिरींचा आढावा घेण्यात येत आहे. भाजपला विजय मिळावा यासाठी भाजप तयारीला लागलं आहे. दरम्यान, नवोदित व चांगल्या जनमत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू झालेली आहे. ज्या भाजप खासदारांची कामे चांगली नाहीत, त्यांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे.