बलात्कार प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता

    डोंबिवली : पोक्सा आणि बलात्कार प्रकरणात भाजप (BJP)  जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांची कल्याण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१९ संदीप माळी यांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    डोंबिवली (dombivali) पूर्वेतील भोपर परिसरात राहणारे संदीप माळी हे भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात एका १९ वर्षीय तरुणीने डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात तिच्यावर संदीप माळी यांनी चार वर्षापूर्वी ती अल्पवयीन असताना बलात्कार केला होता असा आरोप केला होता. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत भाजप जिल्हा उपाध्यक्ष माळी यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.

    संदीप माळीवर तरुणीने केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात वातावरण तापले होते. या मुद्यावर विविध पक्षातील नेत्यांनी भाजप (BJP)

    आणि माळी यांना लक्ष्य केले होते. या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी सुरु केला. कल्याण कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या प्रकरणी काही साक्षीदार तपासले गेले. अखेर या प्रकरणात कल्याण न्यायालयाने आज बुधवारी सुनावणी झाली. कल्याण काेर्टातील जज पी आर. अस्तूरकर यांनी या प्रकरणी निकाल दिला. संदीप माळी यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संदीप माळी यांच्या वतीने वकील अजय पाडे यांनी युक्तीवाद केला होता. अजय पांडे यांचे म्हणणे आहे की, सबळ पुराव्या अभावी माळी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.