राज्यातील भारतीय जनता पक्ष म्हणजे विझलेला दिवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपवर शाब्दिक हल्ला

अमित शाह (Amit Shah) जर सूर्य असतील तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी एका महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे हे आव्हान स्वीकारावे. मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? निवडणुका घेण्यासाठी सरकार वारंवार चालढकल करत असून पळ काढत आहे.

    नाशिक : राज्यातील भाजप (BJP) म्हणजे विझलेला दिवा आहे, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनमाड (Manmad) येथील शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाजपवर केली. अमित शाह (Amit Shah) जर सूर्य असतील तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी एका महिन्यात निवडणुकीला सामोरे जावे हे आव्हान स्वीकारावे. मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? निवडणुका घेण्यासाठी सरकार वारंवार चालढकल करत असून पळ काढत आहे. उद्धव ठाकरे यांचे आव्हान भाजप पेलू शकत नाही म्हणून असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

    दरम्यान, एक दिवा काय करू शकतो हे बावनकुळेंना सांगण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या विधानावर लगावला. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचाही शिवसेना स्टाईलने दानवे यांनी समाचार घेतला. ज्या शिवसेनेने राणे यांना भरभरून दिले त्यांच्यावर टीका केली ही नारायण राणे यांची नमकहरामी असल्याची टीका दानवे यांनी केली.