देवेंद्रजींचे शब्द तर अमृता फडणवीसांचे सूर; फडणवीस दांपत्याचे श्रीरामांवरील नवीन गाणे होणार रिलीज

अमृता फडणवीस यांची गाणी नेहमी चर्चेमध्ये असतात. पण यावेळी चर्चा अधिक रंगली आहे कारण या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

    पुणे : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या (Ram Mandir Inauguration)  निमित्ताने सर्वत्र जल्लोषमय वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यामध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली आहे. अमृता फडणवीस यांची गाणी (Amruta Fadnavis songs) नेहमी चर्चेमध्ये असतात. पण यावेळी चर्चा अधिक रंगली आहे कारण या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी लिहिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील भाजप (BJP PUNE) महिलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो वॉकधॉन’ वेळी त्या बोलत होत्या.

    पुण्यामध्ये अमृत फडणवीस यांनी आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. अमृता फडणवीस या एक गायिका आहेत. त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाले असून लवकर त्यांचे श्रीरामांवर आधारित गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण खास म्हणजे या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहेत. याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रभू श्रीराम यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहिलं आहे. प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात मी देखील गायलं आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत आहे. हे गाणं लवकरच रिलीज होईल, अशी घोषणा त्यांनी दिली.

    पुण्यामध्ये आज भाजप महिला मोर्चाने वॉक फॉर नेशनचे आयोजन केले होते. फर्ग्युसन महाविद्यालयातून या वॉकथॉन सुरुवात झाली. यावेळी अमृता फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते.