ठरलं! जशाच तसे… मविआच्या महामोर्चाला भाजपाकडून ‘माफी मागो आंदोलना’ने उत्तर, उद्या भाजपा विरुद्ध मविआ संघर्ष रस्त्यावर दिसणार

मविआच्या महामोर्चाला जशाच तसे उत्तर देण्यासाठी भाजपा देखील पुढे सरसावली आहे. मविआच्या महामोर्चाला भाजपाकडून ‘माफी मागो आंदोलना’ने उत्तर देणार आहे. उद्या भाजपा ‘माफी मागो आंदोलन’ करणार आहे. त्यामुळं उद्या भाजपा विरुद्ध मविआ असा संघर्ष रस्त्यावर दिसणार आहे.

    मुंबई – महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा निघणार आहे, दरम्यान, या मोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, त्यामुळं हा मोर्चा निघणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, यावर महाविकास आघाडीतील नेत आक्रमक झाले असून, मोर्चावर ठाम असल्याचं मविआतील नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मविआच्या महामोर्चाला जशाच तसे उत्तर देण्यासाठी भाजपा देखील पुढे सरसावली आहे. मविआच्या महामोर्चाला भाजपाकडून ‘माफी मागो आंदोलना’ने उत्तर देणार आहे. उद्या भाजपा ‘माफी मागो आंदोलन’ करणार आहे. त्यामुळं उद्या भाजपा विरुद्ध मविआ असा संघर्ष रस्त्यावर दिसणार आहे.

    आज भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत, या आंदोलनाची माहिती दिली. तसेच अलीकडे मविआतील नेत्यांनी थोर पुरुषांविषयी तसेच संताविषयी जी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, त्याची पहिली माफी मागा, नंतर महामोर्चा काढा असं भाजपा माफी मागो आंदोलना’ने उत्तर देणार आहे. त्यामुळं उद्या मुंबईत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असं संघर्ष दिसणार आहे.

    दरम्यान, महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा मार्ग ठरला असून, राणीची बाग ते आझाद मैदान असा मविआचा महामोर्चा असणार आहे. दरम्यान, मविआच्या महामोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरी, देखील मोर्चावर ठाम असल्याचं मविआतील नेत्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे फक्त मोर्चा काढता येणार, स्टेज किंवा भाषण करता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.