१४ मे रोजी शिवसेनेच्या होणाऱ्या सभेवर भाजपाकडून उपरोधिक टिका, टिव्टच्या माध्यमातून शरद पवारांच्या स्क्रिप्टवर मुख्यमंत्री बोलताहेत असा दाखवला फोटो

एकीकडे शिवसैनिकांची सभेसाठी तयारी सुरु असताना, या सभेवर भाष्य करणारं आणि शिवसेना व मुख्यमंत्री यांच्यावर टिका करणारं एक टिव्ट मुंबई भाजपाने केले आहे. “संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे...” अशा आशयाखाली मुंबई भाजपाने टिव्ट केले असून यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरला आहे. पवार आपल्या कार्यालयात बसून टिव्ही पाहत आहेत. व तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काहीतरी सांगत आहेत.

    मुंबई : शनिवारी १४ मे रोजी शिवसेनेची भव्य आणि दिव्य अशी मोठी सभा होणार आहे. यासाठी शिवसेना तयारीला लागली असून, या सभेसाठी शिवसैनिकांना आमंत्रित करण्यासाठी सभेचे अनेक व्हीडिओ तयार करण्यात आले असून, व्हीडिओच्या माध्यमातून सभेला या अशी शिवसैनिकांना साद घातली जात आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील उल्लेख व्हीडिओत करण्यात येत आहे. या सभेतून मुख्यमंत्री अनेकांवर निशाणा साधणार आहेत. तसेच मी १४ तारखेच्या सभेत अनेकांचे मास्क उतरवणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळं पक्षप्रमुख उद्ध ठाकरे काय बोलणार, कोणावर तोफ डागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, एकीकडे शिवसैनिकांची सभेसाठी तयारी सुरु असताना, या सभेवर भाष्य करणारं आणि शिवसेना व मुख्यमंत्री यांच्यावर टिका करणारं एक टिव्ट मुंबई भाजपाने केले आहे. “संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे…” अशा आशयाखाली मुंबई भाजपाने टिव्ट केले असून यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरला आहे. पवार आपल्या कार्यालयात बसून टिव्ही पाहत आहेत. व तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काहीतरी सांगत आहेत.

    “उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर… होय साहेब” अशा आशयाचा मजकूर या टिव्टच्या माध्यमातून लिहिला आहे. उद्धव ठाकरेंना पवारांनी कसं बोलायचे याबाबत सांगितलं आहे, यावर होय साहेब असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, असं टिव्टच्या माध्यमातून दाखवत मुंबई भाजपाने शिवसेनेवर टिका केली आहे.