भाजपच्या दुसरा टप्पातील ‘मिशन’ ला आजपासून सुरूवात, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांची आज औरंगाबाद, चंद्रपुरात जाहीर सभा

या मिशनसाठी भाजपाने जोरदार तयारी केल्याचं दिसतंय, मिशन १४४ अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील १६ मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

    मुंबई- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींच्या धरतीवर भाजपाने आतापासूनच रणनिती व नियोजन आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, याचाच एक भाग म्हणून भाजपाने दुसऱ्या टप्पातील मिशनला आजपासून सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपच्या “मिशन १४४’ च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चंद्रपुरातून होणार आहे. येथील सिव्हिल लाइनच्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

    दरम्यान, आज नड्डा हे सायंकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे चार्टर्ड विमानाने सकाळी ११ वाजता चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीचे दर्शन घेणार आहेत. ते सायंकाळी ४ वाजता वेरूळ येथील घृष्णेश्वराचे दर्शन घेतील. त्यानंतर औरंगाबादला सायं. ५ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल.

    या मिशनसाठी भाजपाने जोरदार तयारी केल्याचं दिसतंय, मिशन १४४ अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील १६ मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळं येथे जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.