लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार : फडणवीस

राज्यातला संत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे आहेत. राज्याचे भवितव्य अवलंबून असणारी सर्वोच्च न्यायालयाची उद्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या याचिकेवर उद्या म्हणजेच ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती.

    मुंबई – भाजपने सहा महिन्यांपासून १६ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्याचे काम आम्ही केले आहे. पुढची लोकसभेची निवडणूक भाजप-शिवसेना युतीमध्ये आम्ही लढणार आहोत. जे लोकं सध्या आमच्यासोबत आहेत, त्यांना निवडणूक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे खासदार निवडणून आणण्यासाठी त्याचा वापर करू, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

    राज्यातला संत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयाच्या बदलत्या तारखांमुळे अधिक लांबण्याची चिन्हे आहेत. राज्याचे भवितव्य अवलंबून असणारी सर्वोच्च न्यायालयाची उद्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या याचिकेवर उद्या म्हणजेच ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, आता ती सुनावणी लांबणीवर पडली असून, उद्याची सुनावणी आता १२ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे, त्यावर फडणवीस बोलत होते.

    पुढे पत्रकारांनी शिंदे आणि ठाकरे एकत्र यावे यावर प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की, कोण काय म्हणतोय याला राजकारणात महत्व नाही, परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्व आहे. हा काय बोलता, तो काय बोलता यावर उत्तर देण्याइतका रिकामा टेकडा मी नाही.