भाजपाचा आपल्याला पूर्ण पाठिंबा, आपण फक्त एकजुटीने राहू, विजय आपलाच आहे, एकनाथ शिंदेंचा नवीन व्हिडिओ समोर

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर (Eknath Shinde new Video)  आलाय. यामध्ये ते बंडखोर आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. तसेच भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. (BJP Support to us) कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं काळजी करण्याची गरज नसल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत.

    मुंबई : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे.

    वर्षावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेची बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद (Ajit pawar press conference) घेतली आहे. तसेच आता काँग्रेसकडून (Congress) सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत.

    बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ समोर (Eknath Shinde new Video)  आलाय. यामध्ये ते बंडखोर आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. तसेच भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. (BJP Support to us) कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं काळजी करण्याची गरज नसल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. त्यामुळं शिंदे बंडखोर गटाला आता भाजपाचा पाठिंबा आहे हे सिद्ध झालं आहे. तसेच पुढे बोलताना शिंदे व्हीडिओत म्हणाले की, भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. त्यामुळं वेळ पडली तर, त्यांना सुद्धा आपल्याला मदत करावी लागेल असं शिंदे या व्हीडिओत म्हणत आहेत.