भाजपाला महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत का? संजय राऊत यांचा सवाल

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे, मात्र कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, यावरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

    मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 102 दिवस तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वी संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्याने ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, सध्या सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे, मात्र कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, यावरुन खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो असं वाटत आहे, त्यांचा मुंबईवर डोळा आहे, शिंदे-फडणवीस सरकारला लवकरात लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार व राज्य सरकार राहणार नाहीत, असा घणाघात राऊत यांनी भाजपावर केला आहे.

    दरम्यान, सध्या महाराष्ट्र सोडून हे सरकार व मंत्री गुजरातच्या प्रचारासाठी तिकडे गेले आहेत, या सर्व लोकांचा मुंबई व महाराष्ट्रावर डोळा आहे. दरम्यान, बेळगावसह सीमाभाग राहिला बाजूला आणि कोल्हापूरपासून पुढे जात आता थेट सांगलीतल्या तालुक्यांवर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापले असून, भाजपावर टिका केली जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारला व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लवकरात लवकर घालवले पाहिजे असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.