भाजपा ताकदीने मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार : राहुल महाडीक

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागा ताकदीने भाजप मित्र पक्षांना सोबत घेवून लढवणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी पेठ नाका येथे केले.

  इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागा ताकदीने भाजप मित्र पक्षांना सोबत घेवून लढवणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी पेठ नाका येथे केले.

  पेठ नाका येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती व जिल्हा परिषद साठी भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षाच्या इच्छुकांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते.

  राहुल महाडीक म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नाही.उमेदवार निवडताना भाजप, शिवसेना शिंदे गट, हुतात्मा गट,रयत क्रांती संघटना,आर. पी.आय आठवले गट व इतर मिञ पक्ष यांच्यातून सक्षम उमेदवार देण्यात येइल.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपा सक्षमपणे उभा करावयाची आहे. गेली तीन-चार वर्षापासून आपण भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावरच व्हाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे.याचा विचार करून मतदार संघातील कार्यकर्त्यांचा निरोप वरिष्ठ पातळीवरील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पोहोचवणार आहे.”
  ते म्हणाले,” सर्व निवडणुकींचे निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते ठरवणार आहेत त्यांच्याशी आपण संपर्कात आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू असेल.गटातटाच्या राजकारणाला महत्त्व देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील,स्वरुपराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, आढवा बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.यावेळी आष्टा शहर लोकशाही आघाडी अध्यक्ष अमोल पडळकर, माजी जि. प सदस्य निजाम मुलाणी, बागणीचे सरपंच संतोष घनवट यांची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी निवास पाटील, रवींद्र पाटील, प्रा. प्रदीप पाटील, लव्हाजी देशमुख, संदीप पाटील,सचिन सातपुते, शहाजी माने, भास्कर पाटोळे, अभिजित घारे, युवराज कदम, अर्जुन साळुंखे, गोरख पाटील, यांच्यासह रेठरे हरणाक्ष, बोरगाव, वाळवा, बावची, बागणी मतदासंघातील अन्य प्रमूख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.