भाजपाची आज विजयी जल्लोष रॅली, दादर ते नरिमन पाँईट अशी बाईक रॅली काढणार 

राज्यसभेसह (Rajaya sabha election 2022) विधानपरिषद निवडणूक सुद्धा भाजपाने जिंकली आहे, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चा (BJP Yuva morcha) मुंबईतर्फे भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली विजय जल्लोष बाईक रॅली काढून विजय साजरा केला जाणार आहे. ही बाईक रॅली (Bike rally) सकाळी 1 वाजता भाजप मुंबई प्रदेश कार्यालय, वसंत स्मृती दादार येथून निघून ती नरिमन पॉइंट येथील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे जल्लोषाने समाप्त होईल.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी केल्याचे पाहयला मिळाले. दरम्यान, भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे.

    दरम्यान, राज्यसभेसह (Rajaya sabha election 2022) विधानपरिषद निवडणूक सुद्धा भाजपाने जिंकली आहे, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज  भारतीय जनता युवा मोर्चा (BJP Yuva morcha) मुंबईतर्फे भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली विजय जल्लोष बाईक रॅली काढून विजय साजरा केला जाणार आहे. ही बाईक रॅली (Bike rally) सकाळी 1 वाजता भाजप मुंबई प्रदेश कार्यालय, वसंत स्मृती दादार येथून निघून ती नरिमन पॉइंट येथील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे जल्लोषाने समाप्त होईल. या रॅलीत भाजपाचे राज्यातील सर्व नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच विजयी जल्लोष साजरा करणार आहे.