भाजप सर्वच १०५ आमदारांना अहमदाबादला हलवणार ?

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील मविआ सरकार संकटात सापडले आहे. हे सरकार अल्पमतात आले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्ण संधी आहे. पण, यासाठी प्रथम त्यांना आपले 105 आमदार एकजूट ठेवावे लागतील. यामुळे राज्यातील भाजपच्या सर्वच 105 आमदारांना एकत्र करून विशेष विमानाने अहमदाबाद एअरपोर्ट व तेथून थेट रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे.

    मुंबई – मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आता सत्ताधाऱ्यांकडूनही भाजपचे आमदार फोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपपुढे आपले आमदार एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रातील आपल्या सर्वच १०५ आमदारांना अहमदाबाद लगतच्या एका क्लबमध्ये हलवणार आहे. त्यांच्या मुक्कामाची जबाबदारी गुजरात भाजपच्या काही बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील मविआ सरकार संकटात सापडले आहे. हे सरकार अल्पमतात आले तर भाजपला सरकार स्थापन करण्याची सुवर्ण संधी आहे. पण, यासाठी प्रथम त्यांना आपले १०५आमदार एकजूट ठेवावे लागतील. यामुळे राज्यातील भाजपच्या सर्वच १०५आमदारांना एकत्र करून विशेष विमानाने अहमदाबाद एअरपोर्ट व तेथून थेट रिसॉर्ट किंवा क्लबमध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. तूर्त, भाजपकडून सत्ताधाऱ्यांचे अधिकाधिक आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    गुजरात भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाजप आमदार मंगळवारी सायंकाळपर्यंत अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील असा अंदाज आहे. त्यांना विमानतळावरुन चोख सुरक्षा व्यवस्थेत थेट पूर्वनियोजित ठिकाणी नेण्यात येईल. यासाठी केवळ एका रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. तिथे सर्वच १०५आमदारांना एकत्र ठेवले जाईल.