…तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही; जयंत पाटलांचं मोठं विधान

जर २०२४ ला महाविकास आघाडी संघटितपणे लढली तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

    रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पर्व ५ रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघात संपन्न झाली.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा , पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकांबाबतीत एक सूचक विधान केलं आहे. जर २०२४ ला महाविकास आघाडी संघटितपणे लढली तर भाजप ४०-५० पेक्षा जास्त जागांवर निवडून येणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.