पालक मंत्री अजित पवारांना भाजप कोणतेच अधिका देणार नाही, शरद पवार गटाचा दावा

    पिंपरी : महायुती सरकारने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लावली, पण भाजप अजित पवारांना पालकमंत्री पदाचे अधिकार देणार नसल्याचा दावा शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषारकामठे यांनी केला आहे. तर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी कामठे यांचा दांडगा अभ्यास असल्याचे म्हणत हि गोष्टहसण्यावर नेली.

    दोन्ही गटात चांगलेच युद्ध सुरू

    पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चांगलेच युद्ध सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचाबालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात. खुद्द शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे संघर्ष पाहायला मिळत आहे.

    पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार

    चंद्रकांत पाटील यांना काढून पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली. यावर बोलताना पिंपरी चिंचवडचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष कामठे यांनी धक्कादायक विधान केले आहे. भाजपने अजित पवार यांना जरी पालकमंत्रीपद दिले असले तरीअधिकार मात्र दिले नसल्याचे कामठे यांनी म्हटले.

    भाजपने केलेला भ्रष्टाचार अजित पवार बाहेर काढणार

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपने केलेला भ्रष्टाचार अजित पवार  बाहेर काढणार नसल्याचा दावा ही शरद पवारगटाने केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागल्यानं भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढल्याचाखोचक टोला ही शरद पवार गटाने लावला.

    कामठे यांचा अभ्यास दांडगा : गव्हाणे 

    भाजपने जरी अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री केले असले तरी अधिकार दिले नसल्याचे तुषार कामठे यांनी वक्तव्य केले. यावरबोलताना अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की; आता यावर नक्की काय बोलावे हेच कळेना, तरी देखील तुषारकामठे यांचा अभ्यास दांडगा असल्याने त्यांना हे कळाले असेल. असे म्हणत बाकी मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे सांगितले.