बार्शी तालुक्यातील पानगाव, वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

पानगांव व वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी लागला. यामध्ये पानगाव ग्रामपंचायत मध्ये १५ पैकी ११ जागा जिंकत तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ जागा जिंकत आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वर्चस्व सिद्ध केले.

    बार्शी : पानगांव व वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी लागला. यामध्ये पानगाव ग्रामपंचायत मध्ये १५ पैकी ११ जागा जिंकत तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ जागा जिंकत आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वर्चस्व सिद्ध केले.
    विरोधी सोपल गटाला मात्र पानगावमध्ये ४ जागांवर समाधान मानावे लागले. पानगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजयी ११ उमेदवारामध्ये वॉर्ड क्र.१ शोभा माधव कापसे (४७३), रोहीणी पांडूरंग जमदाडे (४६२), वार्ड क्र. २ मधुन नंदकुमार दत्तात्रय काळे(४६४), अंकुश भगवान मोरे(४४६), सखुबाई शहाजी गुजले(४३५), वार्ड क्र.३ मधून दयानंद भाऊ गाडे(६६७), जयसिंगराव पांडूरंग देशमुख(५६८), विद्या तानाजी ढेरे(६३६),वार्ड क्र.५ मधुन सदानंद भाऊ गाडे(६२५), जयश्री अविनाश जाधव(५६३), पद्मजा प्रकाश कानगुडे(५७७), यांचा समावेश आहे. तर वांगरवाडी- तावरवाडी ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित विजय उमेदवारांमध्ये अनंता जगताप शितल काळे, वैशाली तुपे, संगीता तुपे, सोमनाथ इंगळे, अलका शिंदे, नंदा ठोंबरे विजयी या सात जणांचा समावेश आहे.

    दोन्ही ग्रामपंचायत मधील विजयी उमेदवारांची उमेदवारांचे आमदार राऊत, माजी पक्षनेते विजय नाना राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, यांनी अभिनंदन केले.
    यावेळी ग्रामपंचायत विजयासाठी आप्पा कानगुडे, भाऊ गाडे, बाबा कापसे, आप्पा गाडे, लक्ष्मण घोडके, आबा आवारे, दत्ता पाटील, विकास देशमुख, रवी देशमुख, नाना कानगुडे, मोहन काळे, गणेश काळे, भगवान घोलप ,रवी साळुंखे, फिरोज पठाण ,प्रमोद तुपे, नाईकवाडी, रशिद शेख, खंडू आडके उपस्थित होते.