
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपने बदनापूर शहरात बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान भापज कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आले आहेत.
जालना : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली लढाई ही सुरुचं राहणार आहे. सरकारच्या आश्वासनानंतर दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण जरांगे यांनी मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं तरीही राज्यभर मराठा आंदोलकानी आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना केलेला गाव बंदीचा निर्णय अद्यापही मागे घेतलेला दिसून येत नाही. गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपने बदनापूर शहरात बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावरुन भापज कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आले आहेत.
नेमकं काय घडलं ?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपने बदनापूर शहरात बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र मराठा समाजाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि आमदार नारायण कुचे यांचा निषेध करताना जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात असलेले भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने सामाने आल्याने एकच गोधळ उडाला.
दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला आहे. मात्र यावेळी मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे घटनास्ळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे काहीवेळ संभाजीनगर जालना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
उपोषण २ जानेवारीपर्यंत स्थगिक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. तरी राज्यभर मराठा आंदोलकानी आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान अनेक आमदार, खासदारांचे कार्यक्रम उधळण्यात आले. गावातून माघारी पाठवले. त्यामुळे राजकीय नेत्यांना कार्यक्रम, दौरे रद्द करावे लागले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण २ जानेवारीपर्यंत स्थगिक केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी रद्द केलेले कार्यक्रम, दौरे पुन्हा सुरू केले आहेत.