भाजपा कार्यकर्त्यांनी नाल्या, रस्ते साफ करून मुरुड ग्रामपंचायतीला कचरा दिला भेट

अनेक वेळा लेखी तोंडी मागणी करूनही घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष केल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुरुड शहरातील तुंबलेल्या नाल्या, गटारी आणि रस्ते साफ करून गोळा केलेला कचरा ग्रामपंचायत प्रशासनाला भेट देऊन निष्क्रिय कारभाराचा निषेध केला.

    लातूर : अनेक वेळा लेखी तोंडी मागणी करूनही घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष केल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुरुड शहरातील तुंबलेल्या नाल्या, गटारी आणि रस्ते साफ करून गोळा केलेला कचरा ग्रामपंचायत प्रशासनाला भेट देऊन निष्क्रिय कारभाराचा निषेध केला. या आंदोलनाची दखल घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मुरुड शहरातील घाणीचे साम्राज्य तात्काळ हटविण्याची सूचना केली.

    लातूर तालुक्यातील सर्वात मोठे मुरुड हे बाजारपेठेचे गाव असून ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रोगराई मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेळोवेळी गावातील जागोजागी असलेला कचरा आणि घाण तात्काळ हटवण्याची मागणी लेखी आणि तोंडी मागणी वेळोवळी ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र या मागणीकडे मुरुड ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले.

    मुरुड गावात जागोजागी नाल्या तुंबल्याने, गटार तुंबल्याने गावात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते याची जाणीव लक्षात घेऊन मुरुड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कचरा भरो, गटार काढो, गाव स्वच्छ करो हे आंदोलन करत मुरुड गावातील काही ठिकाणी नाल्या, गटारी आणि रस्ते साफ करून जमा झालेला कचरा ट्रॅक्टर मध्ये भरून ग्रामपंचायत प्रशासनाला कार्यालयात जाऊन भेट दिला व निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध केला.

    यावेळी भाजपा आंदोलनकर्त्यानी ग्रामपंचायतच्या गलथान कारभाराचा निषेध करत मुरुड गाव तात्काळ स्वच्छ नाही केले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला असता ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शेख यांनी येत्या दहा दिवसात गावातील सर्व साफसफाई करून गाव स्वच्छ केले जाईल अशी ग्वाही दिली. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा करून मुरुड गावातील घाणीचे साम्राज्य तात्काळ हटवून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सूचना केल्या.

    भाजपाच्या कचरा भरो, गटार काढो आणि गाव स्वच्छ करो या आंदोलनात हनुमंत बापू नागटिळक, अनंत कणसे, वैभव सापसोड, उषा शिंदे, लता भोसले, रवी माकोडे, वैजनाथ हराळे, आकाश सापसोड, नागराज बचाटे, चंद्रकांत पठाडे, बाबा कुंभार, भारत नाडे, विजय गुंड, बालाजी पठाडे, शरीफ सय्यद, दत्ता पोटभरे, सुनील इटकर, शुभम देवकर, रवी पुदाले, श्रीकांत कुंभार, प्रज्योत ढगे, रमजान शेख, भगवान इटकर, दत्ता पुदाले, किशोर पवार, गणेश चव्हाण, संतोष काळे, योगेश पुदाले, राहुल कांबळे, भगवान ईटकर, रामकृष्ण पुदाले, कल्याण पठाडे, संतोष काळे यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.