bjp workers death in jamner

राज्‍यासह जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्‍यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने (BJP) विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व असल्याचे पाहायला मिळाले आहे.

    जामनेर: ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर काहींच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर काहींच्या पदरी निराशा आली. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले.यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

    राज्‍यासह जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्‍यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने (BJP) विजय मिळविला आहे. यात जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्‍व असल्याचे पाहायला मिळाले आहे. या दरम्‍यान जामनेर तालुक्‍यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली.

    पोलिसांनी २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. टाकळी ग्रामपचायतीच्‍या निकालानंतर दोन गट एकमेकांसमोर आले आणि काही जणांनी दगडफेक केली. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी (वय ३२) या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्‍याची माहिती आहे. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश केला.