महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला सांगावे : जे पी नड्डा 

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे.  राज्यात अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारच्या काळात विकासाची कामे थांबवलीत.

    पुणे : महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान, हे गावोगावी जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे.  राज्यात अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारच्या काळात विकासाची कामे थांबवलीत. कोरोनाच्या काळात हा पक्ष आयसीयूत होता, मात्र भाजप सामाजिक कार्यात पुढे होता,असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले. पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यानी राज्य सरकार आणि मोदी सरकारची कामगिरी जनतेपुढे नेण्याचे सांगितले.
    जगात मंदी पण भारत सुरक्षित
    नड्डा पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात मोठा विकास झाला आहे. देशात गेल्या 70 वर्षात 74 विमानतळे झाली. मोदी सरकारच्या 9 वर्षांत 74 विमानतळ झाली आहेत, हा बदल आहे. भाजप  म्हणजेच विकास आहे. जगात मंदी आली आहे, भारत आपल्या नितीमुळे पुढे गेला आहे. भारताला मंदीच्या झळा बसल्या नाहीत. आपल्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. मला महाराष्ट्रात आल्यावर ऊर्जा मिळते असे महंत त्यानी  आज सरकारचा जो अभिनंदनाचा ठराव केला त्याला महाराष्ट्र सरकार पात्र आहे, असे नमूद केले.
    विजय आपलाच
    भाजपला निकालाची चिंता नाहीय, आम्हीच येणार हे माहितीय, आम्हीच पुढे जाणार आहोत. मात्र तेही मेहनीतीने होणार आहे. याठिकाणी आलेल्या प्रत्येकाने 10 लोकं जोडायची आहेत. मग आपले जाळे किती मोठे होईल, ते तुम्हाला दिसेल. राज्यात असो की देशात आता येणारी कुठलीही निवडणूक भाजप जिंकणार आहे. सर्वत्र एनडीएचा विजय होणार आहे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामगिरी जनतेत न्यावी, असे आवाहन जे.पी.नड्डा यांनी केले.