मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा? बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी शडडू ठोकून आहेत.आणि त्याच मावळ मतदार संघात भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.खर तर बाळा भेगडे यांचा 31 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या उर्से टोलनाक्यावर भावी खासदार असा उल्लेख असलेल्या बॅनर पाहायला मिळतं आहे.

    वडगाव मावळ : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी शडडू ठोकून आहेत.आणि त्याच मावळ मतदार संघात भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.खर तर बाळा भेगडे यांचा 31 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या उर्से टोलनाक्यावर भावी खासदार असा उल्लेख असलेल्या बॅनर पाहायला मिळतं आहे.

    खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढल

    मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे.तर शिंदे सरकारमध्ये युती असलेल्या भाजपाने मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे यामध्ये बाळा भेगडे यांच्या भावी खासदाराच्या फलकामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढल असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    २०१९ लोकसभा निवडणूकीत श्रीरंग बारणे व उपमुख्यमंत्री अजित पवार याचे सुपुत्र पार्थ पवार यांची लढत झाली होती.या लढतीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.दुसरीकडे अजित पवार यांनी देखील मावळ लोकसभेवर नुकताच दावा केला आहे ‌एकीकडे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या भावी खासदार म्हणून माधवी जोशी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.

    शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे. मावळ लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार हे आगामी काळच ठरवेल.