पिसेकामते येथे भाजपचे गाव चलो अभियानानिमित्त योजनांची जनजागृती…

कार्यकर्त्याच्या घरी चहापाणी आणि जेवण घेण्यात आले तसेच गावातील विकास कामांवर चर्चा करण्यात आली.

    कणकवली : पिसेकामते येथे भाजपाचे गाव चलो अभियानानिमित्त योजनांची जनजागृती करण्यात आली. यावेळी कणकवली प्रवासी कार्यकर्ता मिलिंद मेस्त्री यांनी नागरिकांशी संवाद साधला.

    यावेळी बूथ अध्यक्ष जनार्दन सावंत, सरपंच प्राजक्ता मुद्राळे, उपसरपंच संकेत राणे, माजी सरपंच सुहास राणे, अंकुश राणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मोहिते, रेश्मा चव्हाण, श्रावणी जाधव, माजी उपसरपंच अनिल गावकर, सुहास कदम, माजी पोलीस पाटील श्रीधर गुरव, मनोहर जाधव, जगन्नाथ मोहिते, नंदू भोगले, आनंद गुरव, पंढरीनाथ भोगले, प्रकाश गुरव, विलास कदम, नितेश भोगले, रत्नाकर राणे, नितीन मुद्राळे आदी उपस्थित होते.

    बचत गट महिला संवाद, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, जेष्ठ कार्यकर्ता चर्चा, मागासवर्गीय वस्ती भेट, दिवार लेखन, शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ याची भेट घेऊन संवाद साधून केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचून त्याची जनजागृती करण्यात आली. तसेच सरकारने केलेल्या कामांची पत्रक वाटप करण्यात आली. कार्यकर्त्याच्या घरी चहापाणी आणि जेवण घेण्यात आले तसेच गावातील विकास कामांवर चर्चा करण्यात आली.