धर्मांतरासाठी तरुणावर दबाव टाकला, इम्तियाज जलील यांच्यावर सावेंचा गंभीर आरोप

इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरुनच ही मारहाण झाल्याचा आरोप पीडिताने भाजपचाही आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी, यासाठी आमदार अतुल सावे यांच्या नैतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांना निवदेन दिले आहे.

    औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. इम्तियाज जलील यांनी एका दलित तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून मारहाण झाल्याचा दावाही या मुलाने केला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर नवे संकट उभा राहिले आहे.

    इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरुनच ही मारहाण झाल्याचा आरोप पीडिताने भाजपचाही आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी, यासाठी आमदार अतुल सावे यांच्या नैतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांना निवदेन दिले आहे.

    राज्याचे सहकारमंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांनी या प्रकरणात भाष्य केले आहे. त्यांचा आरोप आहे की, मारहाण झालेला मुलगा दलित असून त्याचे एका मुलीवर प्रेम आहे. या प्रेमप्रकरणातून त्याच्यावर जबरदस्ती केली जात होती. त्याला धर्मांतर करण्यासाठी सक्ती केली जात होती.

    अतुल सावे म्हणाले, खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाकडे त्याला बोलावून त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली. आम्हाला शंका आहे की, या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा हात होता.