पंतप्रधानांना दाखविले काळे झेंडे ; माेदींच्या साेलापूर दाैऱ्यात शहर काँग्रेसचे पदाधिकारी ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यात ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे ,तिरुपती परकिपंडला, सुभाष वाघमारे यांना सदरबझार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले.

  सोलापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यात ताफा अडवून काळे झेंडे दाखवून निषेध करणारे सोलापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी अंबादास बाबा करगुळे, गणेश डोंगरे ,तिरुपती परकिपंडला, सुभाष वाघमारे यांना सदरबझार पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले.

  आमदार प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांच्या फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधून विचारपूस करताना लढते रहो, भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, हुकूमशाही विरूद्ध संघर्ष करा, असे सांगितले. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माऊली पवार, देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे यांनी सदर बाझार पोलीस स्टेशन येथे भेट देऊन विचारपुस केली

  पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर बझार पोलिस स्टेशन येथे संजय गायकवाड, नागेश म्याकल, शिवशंकर अंजनाळकर, वसिष्ठ सोनकांबळे, धीरज खंदारे, राजू निलगंटी, नागनाथ शावने यांनी भेटून विचारपूस केली.

  घरकुल वाटपास विरोध नव्हता
  यावेळी बोलताना अंबादास करगुळे आणि तिरुपती परकीपंडला यांनी सांगितले, वास्तविक पाहता रे नगर घरकुल वाटप कार्यक्रमास आमचा कोणताही विरोध नव्हता, तरीही पोलिसांनी आम्हाला आज सकाळी ८:३० वाजता ताब्यात घेऊन मोबाईल फोन ही काढून घेतले.

   हुकूमशाही प्रवृत्तीिवराेधात लढणार
  अंबादास करगुळे आणि तिरुपती परकीपंडला म्हणाले, विडी कामगार आणि श्रमिकांच्या घरकुल योजनेस तत्कालीन युपीए सरकारचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सहकार्य केले. आमदार प्रणिती शिंदे नेहमीच विडी कामगार आणि श्रमिकांसाठी लढत असतात. आमचा विरोध फक्त भाजप आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांना आहे. त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आहे. ताे यापुढे ही राहणार अाहे. लोकशाही पद्धतीने त्यांच्या धोरणाविरुद्ध लढत राहणार अाहे.