जालना एमआयडीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ५ ते ८ कामगार गंभीर जखमी

जालना औद्योगिक वसाहतीमधील आज दुपारच्या स्टील कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ८ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    जालना : जालन्यातुन(Jalna) एक मोेठी बातमी समोर येत आहे. जालन्यातील एमआयडी परिसरात (Blast In Jalna MIDC) असलेल्या गीताई स्टील कंपनीत  आज भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीतील भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ८ कामगार जखमी झाले आहे. तर, दोन जण गंभीर झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींवर औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    औद्योगिक वसाहतीमधील आज दुपारच्या सुमारास स्टील कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ८ जण जखमी झाले असुन दोघांंची प्रकृती चिंताजनक आहे.