मुंबईसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कोणताही घातपात घडू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी आणि खबरदारी घेतली जात आहे. हायअलर्ट जारी केल्याने मुंबईत नाकाबंदी करण्यात आली असून दुचाकी, चारचाकी, रिक्षा यासह ट्रक, टेम्पो या वाहनांची तपासणी केली जात आहे. दोन दिवस हा हायअलर्ट मुंबईत राहणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या १४ जून रोजी देहू (Dehu) येथे येणार आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सूचनेनंतर मुंबई(Mumbai)सह संपूर्ण राज्यात अलर्ट (Alert) देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आल्यामुळे रात्री शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी (Blockade) करण्यात आली होती. तसेच, मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

    पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कोणताही घातपात घडू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी आणि खबरदारी घेतली जात आहे. हायअलर्ट जारी केल्याने मुंबईत नाकाबंदी करण्यात आली असून दुचाकी, चारचाकी, रिक्षा यासह ट्रक, टेम्पो या वाहनांची तपासणी केली जात आहे. दोन दिवस हा हायअलर्ट मुंबईत राहणार आहे.

    संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) यांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी देहू संस्थानने मार्च महिन्यात पंतप्रधान मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिले होते. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले असून त्यांनी १४ जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली. देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत त्या शिळा मंदिराची पायाभारणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती.