सोलापूर- धुळे महामार्ग अडवत मराठा समाजाचे रस्तारोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा

सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरात आंदोलन करण्याचं, रस्ता रोको करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे.

    बीड : सगेसोयरे अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरात आंदोलन करण्याचं, रस्ता रोको करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे.

    सोलापूर -धुळे महामार्ग पेंडगाव या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप करत लवकरात लवकर सगे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करून ओबीसीतूनच 50% च्या आत आरक्षण मिळावं, अशी मागणी पुन्हा एकदा आंदोलकांनी केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं असून, येणाऱ्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवणार आहोत, असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे.