मुंबईतील रस्त्यांचे पालिकेला एकछत्री अधिकार द्या – मुंबई पालिका आयुक्त चहल यांची मागणी

खड्डयांबाबत वस्तुस्थितीही समजून घेतली पाहिजे, मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडले की, पालिकेच्या नावाने खडे फोडले जातात. मात्र त्यासाठी आम्हाला एकछत्री अधिकार द्या, पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांची संपूर्ण जबाबादारी घेण्यास आनंदाने तयार आहे, अशी ग्वाही चहल यांनी दिली.

  मुंबई : रस्त्यांवर खड्ड्यांचे (Potholes In Mumbai) सांम्राज्य पसरले की बृहन्मुंबई महानगरपालिकेवर खापर फोडले जाते. मात्र, हे वस्तूस्थितीला धरून नसून मुंबईत महापालिकेसह (BMC) विविध १५ प्राधिकरणांच्या अखत्यारित रस्ते उभारण्यात येतात. मुंबई चांगले रस्ते उभारण्यासाठी एक नियोजन प्राधिकरणाची आवश्यकता असून पालिकेला एकछत्री अधिकार दिल्यास तीन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही शुक्रवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbalsingh Chahal) यांनी दिली.

  राज्यासह मुंबईतील निकृष्ट रस्ते व खड्डयांची तक्रार नागरिकांना नोंदविता यावी, म्हणून उच्च न्यायालयाने १२ एप्रिल २०१८ रोजी खड्ड्यांबाबत स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश दिले. मात्र, राज्य सरकार, पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थानी कोणतीही पूर्तता न केल्याने वकील रुजू ठक्कर यांनी ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांच्यामार्फत अवमान याचिका दाखल केली आहे.

  या याचिकेवर मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने पालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुख्य न्या. दीपांकर दत्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष दालनात सुनावणी पार पडली. यावेळी आयुक्त चहल यांनी वस्तूस्थिती खंडपीठासमोर ठेवली.

  खड्ड्यांसाठी पालिका जबाबदार नाही
  मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले की पालिकेला जबाबदार धरले जाते मात्र, मुंबईत पालिकेसह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमएमआरसी, पीडब्ल्यूडी, एमबीपीटी, एएआय,बीएआरसी इत्यादी अनेक प्राधिकरणांच्या अखत्यारीतही अनेक रस्ते येतात. बोरीवलीत अपघातातील पालिकेच्या नाही तर रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत होता, असा दावा चहल यांनी दिला.

  पालिकेला एकछत्री अधिकार द्या
  खड्डयांबाबत वस्तुस्थितीही समजून घेतली पाहिजे, मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडले की, पालिकेच्या नावाने खडे फोडले जातात. मात्र त्यासाठी आम्हाला एकछत्री अधिकार द्या, पालिका मुंबईतील सर्व रस्त्यांची संपूर्ण जबाबादारी घेण्यास आनंदाने तयार आहे, अशी ग्वाही चहल यांनी दिली. फेब्रुवारी २०२१ रोजी आम्ही मुख्य सचिवांना पत्र पाठवले होते जर तसे झाल्यास तर पुढची २० ते ३० वर्ष त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, असेही चहल यांनी स्पष्ट केले.

  रस्त्यांवरील खड्ड्यांची कारणं
  साल २०१८ पासूनच्या तुलनेत मुंबईत यंदा पाऊस जास्त प्रमाणात झाला असून विकासकामांसाठी होणारी अवजड वाहनांची वाहतुक, मेट्रो, कोस्टल रोड, वाहनांची वाढती संख्या, मोबाईल कंपन्या, वीज कंपन्या, पालिकेच्या सांडपाण्याच्या लाईनमुळे रस्त्यांवर फार ताण पडत असून सण उत्सवातील मंडपांमुळेही रस्त्यांचं मोठ नुकसान होत असल्याचे चहल यंनी सांगितले.

  खड्ड्यांबाबत करत असलेले उपाय
  पालिकेकडून चार प्रकारे रस्त्यंवरील खडडे बुझविता येता. तातडीचे उपाय म्हणून ‘पेव्हर ब्लॉक’ आणि ‘कोल्ड मिक्स’ वापरले जाते, रॅपिड हार्डनिंग कॉक्रिंट (आरएचसी) आणि ‘मॅस्टिक’ या आधुनिक पद्धतीसाठी निदान आठ तास पावलाची विश्रांती आवश्यक आहे.

  मुंबईतील २० खराब रस्ते
  मुंबई शहर आणि उपनगरातील २० खराब रस्त्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली. त्यानुसार, मुंबादेवी मार्ग (तांबा काटा रस्ता), व्ही. एन. नाईक मार्ग, टी.बी.कदम मार्ग, बलराम बापू खेडेकर मार्ग आणि टी.जी रोड या शहरातील पाच, तर टागोर मार्ग, खेरवाडी वांद्रे,आरे-मरोळ-मरोशी, पू.ल देशपांडे, एन. एस. रोड, आरे रोड, भूमी पार्कमरीन एनक्वेव्ह, समतानगर, अप्पासाहेब सिद्धे आणि रामकुमार ठाकूर या पश्चिम उपनगरांचा यात समावेश आहे. तर एम.एम (एलबीएस- कुर्ला), पी.डी रोड चांदीवली, शिवाजीनगर गोवंडी, सोनापूर लेन, दर्गा रोड, भांडूप विलेज रोड या पूर्व उपनगरपातील खराब रस्त्यांचा समावेश होतो. त्याची दखल घेत नगरविकास खात्याला पत्राचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश देऊ असे संकेत संपूर्ण सादरीकरणावर सकारात्मक अहवाल दर दोन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

  ९९० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण
  मुंबईला २०२५० किमी लांबाचा रस्ता लाभला असून त्यापैकी ९९० किमी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिंटीकरण झाले आहे. २६५ किमी रस्त्यांचे काम सुरू असून ३९७ किमीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि उवर्रित रस्तेही पूर्ण होतील अशी माहिती चहल यांनी दिली. महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत असून चेंबूरपासूनचा सायन पनवेल रस्ता हा एमएमआरडीएकडे आहे, वर्षानुवर्ष खड्ड्यांचे साम्राज्य असून दहिसर चेकनाका, मुलूंड चेक नाका हा परिसरही एमएमआरडीएच्या अखत्यारीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.