मुंबईत कुलाब्याजवळच्या समुद्रात बोट बुडाली

मुंबईतील बालार्ड पिअर बंदरावरून निघालेली मालवाहू बोट बुडाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या बोटीवर तिघेजण होते. परंतु, तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्या बोटीशेजारी दुसऱ्या काही बोटी होत्या, त्यामुळे उडी मारलेल्या खलाशांना वाचवण्यात यश आले(boat sinks off Ballard Pier in Mumbai).

    मुंबई : मुंबईतील बालार्ड पिअर बंदरावरून निघालेली मालवाहू बोट बुडाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या बोटीवर तिघेजण होते. परंतु, तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्या बोटीशेजारी दुसऱ्या काही बोटी होत्या, त्यामुळे उडी मारलेल्या खलाशांना वाचवण्यात यश आले(boat sinks off Ballard Pier in Mumbai).

    दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास मुंबई पोर्ट ट्रस्टकडून करण्यात येत असून मालवाहू बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेला जात होता का, या दिशेने तपास करण्यात येणार असल्याचे समजते. शिप-टू-शोअर करण्याची प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडली.

    परदेशातून आलेल्या जहाजावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी (शिप टू शोअर) ही बोट तैनात करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्याने ती बुडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बोटीत तीन खलाशी होते. बोट बुडत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला. जवळच्या एका मालवाहू बोटीवर असलेल्या अन्य खलाशांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने आत घेतले. त्यानंतर काही सेकंदानी या बोटीला जलसमाधी मिळाली.