Maharashtra Assembly Session : ‘असले गुरू नको रे बाबा’! यांनीच फासलाय शिक्षणाला काळीमा;  मग विद्यार्थ्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा?

या प्रकरणात शाळा संस्थाचालक (School Principal), शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक (Education Officer and Deputy Director of Education) यांची साठगाठ असून हा सुमारे १ हजार कोटी रुपयांहून अधिकचा महाघोटाळा (Big Scam) आहे. या घोटाळ्याची पोलीस अथवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून नीट चौकशी होऊ शकणार नाही, त्यामुळे याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांची विधानपरिषदेत आज केली.

  • शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या, मान्यता प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी व्हावी; नागोराव गाणार यांची मागणी

मुंबई : राज्यात (Maharashtra) शालेय शिक्षण विभागामार्फत (Department of School Education) मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या (Bogus appointments of teachers) आणि त्यानंतर मान्यता (followed by approval) देण्यात आल्या आहेत. अशीच शालार्थ आयडीची प्रकरणे (School ID Case) उजेडात आली आहेत.

या प्रकरणात शाळा संस्थाचालक (School Principal), शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक (Education Officer and Deputy Director of Education) यांची साठगाठ असून हा सुमारे १ हजार कोटी रुपयांहून अधिकचा महाघोटाळा (Big Scam) आहे. या घोटाळ्याची पोलीस अथवा इतर यंत्रणांच्या माध्यमातून नीट चौकशी होऊ शकणार नाही, त्यामुळे याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी आग्रही मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांची विधानपरिषदेत आज केली(teacher mla nago ganar has made an urgent demand in the legislative council today that this should be investigated through ed).

विशेष उल्लेखाद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील शाळांमध्ये शासन निर्णय २ मे, २०१२ नंतर बोगस शिक्षक नियुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. हा प्रचंड मोठा घोटाळा असून यात शाळा संस्थाचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांची साठगाठ आहे. बोगस शिक्षण नियुक्ती प्रकरणात शेकडो कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी. त्यामुळे ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असून यामुळे नियुक्ती, मान्यता, शालार्थ आयडी प्रकरणात दोषी असलेल्या संस्थाचालक, शिक्षण अधिकारी आदींवर कठोर स्वरुपाची शिक्षा देण्यासाठी सदर प्रकरणे ईडीकडे सोपविण्यात यावीत अशी मागणी शिक्षक आमदार गाणार यांनी केली.