मोठी बातमी ! पुणे रेल्वे स्थानकात आढळली बॉम्बसदृश्य वस्तू; संपूर्ण शहरात खळबळ

पुणे रेल्वे स्थानकात बाँबसदृश्य वस्तू आढळून आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी रेल्वे स्थानक रिकामे केले. बॉम्बशोधक पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यावेळी जिलेटीनच्या तीन कांड्या दिसून आल्या. त्यानंतर त्या घेऊन एका शाळेच्या ग्राऊंडवर निकामी करण्याची कारवाई सुरू केली आहे.

    पुणे : पुणे रेल्वे स्थानकात बाँबसदृश्य वस्तू आढळून आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी रेल्वे स्थानक रिकामे केले. बॉम्बशोधक पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यावेळी जिलेटीनच्या तीन कांड्या दिसून आल्या. त्यानंतर त्या घेऊन एका शाळेच्या ग्राऊंडवर निकामी करण्याची कारवाई सुरू केली आहे.

    दरम्यान काही वेळासाठी संपुर्ण परिसर सील करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे दाखल झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान त्या केवळ जिलेटीनच्या कांड्या होत्या. त्याला डिटोनेटर नव्हते. त्यामुळे स्फोटके नसल्याचे पोलीस सांगत आहेत. जिलेटीनच्या कांड्या ठेवणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे रेल्वे प्रवाशाने परिसर गजबजलेला होता. अकराच्या सुमारास फलाट क्रमांक एकवर काही बॅगांच्या जवळ बॉम्बसदृश्य वस्तू दिसून आली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. लगेच बंडगार्डन पोलिसांनी धाव घेतली. त्यापाठोपाठ बीडीडीएसही श्वान घेऊन दाखल झाले. तपासणी केल्यानंतर 3 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. त्यानुसार बीडीडीएस आणि बंडगार्डन पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन जवळच्या एका मैदानात नेल्या. तेथे त्या नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    दरम्यान, या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही येथे धाव घेत माहिती घेतली. त्यांनी यावेळी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्या जिलेटीन कांड्या नसल्याचे म्हणणे आहे.