flayers found at uran

उरणच्या समुद्रकिनारी (Uran Beach) दहा ते बारा स्फोटक कांड्या (Bomb Like Object) सापडल्या आहेत. मोरा पोलीसांसह एसीपी कार्यालयाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    रायगड : उरणच्या (Uran) केगाव समुद्रकिनाऱ्यावर (Kegaon Beach) गुरुवारी स्फोटकसदृश्य वस्तू (Bomb Like Object In Uran) सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्या फ्लेअर्स असल्याची माहिती समोर आली. स्थानिक पोलीस व ओएनजीसी कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या साध्या फ्लेअर्स आहेत.

    या फ्लेअर्स आपत्कालीन परिस्थितीत सिग्नल देण्यासाठी बोट व ओएनजीसी ऑफ शोर रिगवर वापरल्या जातात. उरणच्या केगाव समुद्रकिनारी सापडलेल्या या फ्लेअर्सची एक्सपायरी डेट संपली होती. त्यामुळे गार्बेज ट्रान्स्फरच्या वेळी किंवा बोटीतून त्या समुद्रात पडल्या असाव्या असे मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी सांगितले आहे. सध्या त्या फ्लेअर ओएनजीसी येथे डीसपोजलला गेल्या आहेत.

    या फ्लेअर्रचा फक्त आपत्कालीन परिस्थितीत उपयोग केला जात असल्याने बऱ्याच वेळा त्या न वापरता एक्सपायर होऊन जातात. अशा वेळी त्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. त्यामुळे या फ्लेअर्स बोटीतून त्यांची ट्रान्सफर करताना किंवा कचऱ्याचे ट्रान्स्फर करताना ओव्हरलोड असल्यास त्या समुद्रात पडू शकतात. व त्यामुळे उरणच्या समुद्रकिनारी देखील बोटीतून पडलेल्या या फ्लेअर्स आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.