मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

महिनाभरापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलला देखील बॉम्बच्या धमकीचा कॉल आला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीस बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एका महिन्याने सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीस अनोळखी व्यक्तीने कॉल करून मुंबईत बॉम्ब घडवून आणण्याची धमकी दिली.

    मुंबई – मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणू असा कॉल सांताक्रुज येथील एका व्यक्तीस प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा घबराहट पसरली आहे. बॉम्बच्या धमकीचा कॉल प्राप्त झालेल्या व्यक्तीने अज्ञात इसमाविरोधात मुंबई पोलिसात आयपीसी कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

    महिनाभरापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलला देखील बॉम्बच्या धमकीचा कॉल आला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीस बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एका महिन्याने सांताक्रुज परिसरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीस अनोळखी व्यक्तीने कॉल करून मुंबईत बॉम्ब घडवून आणण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आलेल्या कॉलचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.