संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात म्हटले आहे की, असे लग्न वैध मानले जाऊ शकत नाही ज्यामध्ये जोडपे मानसिक, भावनिक किंवा शारीरिकदृष्ट्या एकमेकांशी जोडू शकत नाहीत.

  मुंबई : लग्नानंतर पती पत्नीच्या नात्यामध्ये मानसिक,शारिरिक आणि भावनिक बंध तयार होतात जे त्यांच्या नात्याला आणखी घट्ट करतात. पण जर जोडपं मानसिक,शारिरिक रित्या एकत्र नसतील तर त्यांच्या नातं रुक्ष होत जातं आणि हेच कारण कालातरांने दोघांमध्ये अंतर निर्माण करतं. अशाच प्रकारचं एक प्रकरणा मुंबई उच्च न्यायालयाने  (Bombay High Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पती-पत्नीमध्ये मानसिक, शारीरिक आणि भावनिक बंध नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका तरुण जोडप्याचा विवाह अवैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात म्हटले आहे की, असे लग्न वैध मानले जाऊ शकत नाही ज्यामध्ये जोडपे मानसिक, भावनिक किंवा शारीरिकदृष्ट्या एकमेकांसोबत जुळलेलले नाही. सापेक्ष नपुंसकत्व (relative impotency) असलेल्या जोडप्याला दिलासा देत न्यायालयाने त्यांचा विवाह रद्द केला.

  नेमकं प्रकरण काय?

  एका 26 वर्षीय पत्नीने तिच्या 27 वर्षीय पतीसोबत असलेलं लग्न रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या जोडप्याने मार्च 2023 मध्ये लग्न केले परंतु 17 दिवसांनी ते वेगळे झाले. या जोडप्याने सांगितले की त्यांचे लग्न पूर्ण झाले नाही. पतीने तिच्यासोबच शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा दावा महिलेने केला. त्यामुळे तिने विवाह रद्द करण्याची मागणी  करणारी याचिका  कौटुंबिक न्यायालयात दाखल केली होती. तिच्या याचिकेत तिनं पतीला ‘सापेक्ष नपुंसकत्व’ असल्याचं म्हटलं. मात्र,  कौटुंबिक न्यायालयानं याचिका फेटाळली यानंतर या जोडप्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानं या प्रकरणात निर्णय देताना म्हटलं की, ‘रिलेटिव्ह इम्पोटेन्स’ ही सर्वज्ञात स्थिती आहे आणि ती सामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळी आहे. न्यायालयाने म्हटले की, ‘सापेक्ष नपुंसकत्वा’ची विविध शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत विवाह रद्द ठरवला. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती एस.जी.चपळगावकर यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना हा विवाह बेकायदेशीर ठरवला. मानसिक, भावनिक किंवा शारीरिकरित्या एकमेकांसोबत शकणाऱ्या विवाहित तरुणांना मदत करण्यासाठी हे योग्य प्रकरण असल्याचे खंडपीठानं म्हटलं आहे.

  सापेक्ष नपुंसकता म्हणजे काय ( Relative Impotancy )

  ‘रिलेटिव्ह नपुंसकत्व’ म्हणजे नपुंसकत्व ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असू शकते, परंतु इतर लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम असू शकते. ही सामान्य नपुंसकत्वापेक्षा वेगळी परिस्थिती आहे.

  न्यायालयाचं काय म्हणणं?

  लग्न रद्द करण्याच्या याचिकेत पत्नीने म्हण्टलं होतं की,  ते एकमेकांशी मानसिक, भावनिक किंवा शारीरिकरित्या जुळू शकत नाहीत. तर पतीनेही पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत नसल्याचा दावा केला होता. तो त्याच्या आयुष्यात सामान्य आहे मात्र, पत्नीसोबत शारीरिक संबंध करु शकत नव्हता. मात्र, न्यायालयाने म्हटले की पुरुषाने सुरुवातीला आपल्या पत्नीला लैंगिक संभोग करण्यास असमर्थतेसाठी दोषी ठरवले कारण तो तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास अक्षम आहे हे स्वीकारण्यास कचरत होता, किंबहुना त्याला नपुंसक असल्याचा कलंक नको होता. अशा सापेक्ष नपुंसकतेची अनेक शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. खंडपीठाने सांगितले की, सध्याच्या प्रकरणात हे सहज समजू शकते की पतीमध्ये पत्नीबद्दल सापेक्ष नपुंसकता आहे. विवाहसंबध पुढे न जाण्यामागचं कारण उघडपणे पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यास पतीची असमर्थता आहे.