लग्नाच्या मॅटरवरून प्रेयसी प्रियकराला धमकावत होती, त्रास असह्य झाल्याने प्रियकराची आत्महत्या!

आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

    वर्धा : प्रेयसीच्या धमकीला घाबरून प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना वर्धेतील सांवगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आशिष भोपळे असं या तरूणाचं नाव आहे. प्रेयसी सतत लग्नावरून धमकवत होती आणि पैशाची मागणी करत असल्याची बाबही समोर आली आहे. तिच्या सततच्या त्रासाली कंटाळून त्याने आत्महत्या केली.

    विरुळ आकाजी येथील रहिवासी असलेला मृतक आशिष भोपळे आणि पारबता कुंभेकर यांचे प्रेमसंबंध होते. पारबता ही नेहमी लग्नाच्या विषयावरून आशिषचा छळ करत होती. सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून ती आशिषला नेहमी त्रास द्यायची. ‘तुझे लग्न कसे होते मी बघते’, अशी धमकी देऊन आशिषकडून वारंवार दोन लाख रुपयांची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यास तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवे मारुन, तुला पोलीस केसमध्ये फसवेन, अशी धमकी आशिषला देण्यात आली होती. त्यामुळे घाबरून गेलेल्या आशिषने मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आशिषने आत्महत्या केलीय. आशिषने मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुसाईड नोट हाती लागल्यानंतर आशिषची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.