प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराची आत्महत्या, चंद्रपूरच्या मूल येथील खळबळजनक घटना

प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मूलमध्ये घडली. गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे ( ४५) आहे. मुल शहरातील वार्ड क्र. ११ मध्ये तो वास्तव्याला होता.

    चंद्रपूर : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मूलमध्ये घडली. गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे ( ४५) आहे. मुल शहरातील वार्ड क्र. ११ मध्ये तो वास्तव्याला होता.

    प्रेयसीला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न

    मृतक रामचंद्र निमगडे हे मूल येथील रहिवासी आहे. त्याचे घराशेजारी राहणाऱ्या एका विवाहीत महिलेशी ब-याच वर्षापासून प्रेमसंबध होते. याच कारणामुळे मृतकाच्या घरी नेहमी भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने एका बाटलीमध्ये पेट्रोल आणून प्रेमसंबध असलेल्या प्रेयसीच्या घरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व प्रेयसीला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला.

    प्रेयसीवर पेट्रोल टाकल्यानंतर तणावामध्ये असताना निमगडे याने वार्ड क्र.11 मधील राहत्या घरी येवून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. पेट्रोल टाकून जखमी झालेल्या महिलेला मूलमध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

    दरम्यान,घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी भेट दिली. जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याने मृतक बंडू निमगडे यांच्या विरूद्ध 307 चा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बन्सोड हे करीत आहेत.