crime scene

वंदना द्विदेदी असं मृत मुलीचं नाव आहे. ऋषभ राजेश निगम असं आरोपीचं नाव आहे. या घटनेनं हिजेंवाडीतील आयटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  पुणे : प्रेमात आणि युध्दात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र, आजकाल प्रेमसंबधात क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरुन भांडण होऊन नात्यात वितुष्ट येतं आणि हेचं नातं संपवण्याला कारण ठरतं. कधी कधी नात्यात आलेला दुरावा, संशयानं घेतलेली जागा नातं तोडण्यासोबत गुन्हे घडण्यालाही कारणीभूत ठरतं. असाच काहीसा प्रकार पुण्यातुन समोर आला आहे. प्रियकराच्या डोक्याात संशयाचं भुत घुसल्याने त्यानं सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रेयसीवर गोळ्या झाडत तिची हत्या (Boyfriend Killed Girlfriend) केल्याची धक्कादायक घटना हिजेंवाडी (Hinjewadi) परिसरात उघडकीस आली आहे. वंदना द्विदेदी असं मृत मुलीचं नाव आहे. ऋषभ राजेश निगम असं आरोपीचं नाव आहे. या घटनेनं हिजेंवाडीतील आयटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  नेमका प्रकार काय?

  मिळालेल्या माहितीनुसार, मृत वंदना द्विदेदी आणि आरोपी राजेश निगम यांच्यात प्रेमसंबध होते. दोघेही लखनौचे राहवासी आहेत.  जॅाबसाठी वंदना पुण्यात राहत होती. तर ऋषभ लखनौमध्ये एका कंपनीत काम करत होता. दोघांच लाँग डिस्टन्स रिलेशनशीप असल्याने राजेश नेहमी वंदनावर संशय घेत होता. यावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. 25 जानेवारी रोजी ऋषभ पुण्यात वंदनाला भेटायला आला होता. त्याने लक्ष्मी चौक येथे OYO हॉटेलमध्ये भाड्याने रुम घेतली होती. दोन दिवसांपासून दोघेही तिथेच राहत होते. रविवारी त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण झालं. रागाच्या भरात ऋषभने वंदानावर पाच गोळ्या झाडून हत्या केली आणि पसार झाला.

  मुंबई पोलिसांची केली अटक

  वंदनाची हत्या केल्यानंतर ऋषभने पळ काढला. या घेटनेची माहिती पोलिसांना मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पुणे पोलीस तात्काळ ऋषभच्या मागावर गेले तोपर्यंत तो मुंबईला निघून गेला होता. त्यांनी मुंबई पोलिसांनी याबद्दल कळवताच मुंबई पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

  ऋषभने एका पाठोपाठ एक वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो हॉटेलमधून शांतपणे निघून जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. ऋषभ याच्याकडे बंदूक आली कुठून आली? दोघांमध्ये नेमकं काय झालं? पाच गोळ्या झाडल्यानंतरही हॉटेलमध्ये आवाज का आला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलीस अधित तपास करत आहेत.