crime scene

प्रेमाला विरोध केल्याने एका सनकी प्रियकराने प्रेयसीच्या आईची गळा आवळून हत्या केली. हत्येसाठी त्याने कुत्र्याचा पट्टा वापरला होता. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

  पुणे : प्रेम आंधळ असतं असं म्हणताच. प्रेमात वय,जात, धर्म कशाचही बंधन नसतं. मात्र, संगणक अभियंता असलेल्या आपल्या मुलीचे एका डिलिव्हरी बॉयसोबत असलेले प्रेमसंबध एका आईला मान्य नव्हते. तिने मुलीला त्या मुलासोबत संबध तोडायले लावले. मात्र नातं तोडल्यानंतर याचे परिणाम फार वाईट होणार याची कल्पना बहुतेक आई आणि मुलीला नव्हती. मुलीनं नातं तोडल्यानंतर संतापलेल्या प्रियकरानं थेट प्रेयसीच्या घरी जाऊन तिच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.

  नेमका प्रकार काय?

  पुण्यातील पाषाण सुस परिसरातुन खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका सनकी प्रियकराने प्रेयसीनं संबंध तोडल्याच्या रागात  तिच्या आईची हत्या केली. वर्षा क्षीरसागर (58) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी प्रियकर शिवांशू दयाराम गुप्ता (२३) याला अटक करण्यात आली आहे. मृताच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

  मुलीच्या प्रेमसंबधाला आईचा होता विरोध

  मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा क्षीरसागर या त्यांची मुलगी मृण्मयी क्षीरसागर (22) हिच्यासोबत पुण्यातील पाषाण सुस रोडवर असलेल्या माउंटव्हर्ट आल्टसी सोसायटीमध्ये राहत होत्या. त्यांची मुलगी संगणक अभियंता आहे.  1 जानेवारीला त्यांच्या पतिचं निधन झालं. त्यांची मुलीची सुमारे सात महिन्यांपूर्वी शिवांशू दयाराम गुप्ता याच्याशी डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. या ओळखीचं रुपातंर प्रेमात झालं. काही महिन्यांनी तिचा प्रियकर शिवांशू हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचे तिला समजले. मात्र त्यांचे हे प्रेमसंबध वर्षा क्षीरसागर यांना मान्य नव्हते. त्यांनी मृण्मयीला शिवांशूसोबतचे संबध तोडण्यास सांगितले.

  आईनं प्रेमसंबध तोडण्यास सांगितल्याचा रागातुन हत्या

  मृण्मयीनं आईचं ऐकून शिवांशूशी संबंध तोडले. त्याला भेटणही बंद केलं. याचा राग शिवांशूच्या मनात होता. त्याने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने तो आणखी संतपला. एक दिवस तो रात्री मृण्मयीच्या घरी पोहोचला. त्यावेळी मृण्मयी घरी नव्हती. तिची आई आरोपी शिवांशूला आधीच ओळखत होती, म्हणून तिने दार उघडून त्याला आत प्रवेश दिला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने मृण्मयीच्या आईला लग्नासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तीने विरोध केल्याने त्याने कुत्र्याला बाधंतात त्या बेल्टने गळा दाबून तिचा खून केला आणि पळून गेला. यानंतर मृण्मयीच्या तक्रारीवरुन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि  आरोपीला अटक केली.