brahmanand padalkar case miraj-tahsil-court orders demolised shops and hotels get justice

जेसीबीच्या सहाय्याने मिरज शहरात दुकाने आणि हॉटेलचं बांधकाम पाडण्यात आलं होतं. बेकायदेशीररित्या जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

    सांगली : सांगली जिल्ह्यातल्या (Sangali District) मिरज शहरातील (Miraj City) दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम (Shops And Hotel Construction) जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले होते (Demolished With The Help Of JCB). या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंजद पडळकर (BJP MLA Gopichanjad Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brother Brahmanand Padalkar) यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांना आणखी एक दणका बसला आहे. मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी (Miraj Taluka Judicial Magistrate) त्या जागेबाबत आता निकाल दिला आहे. यात मिळकतदारांचा त्या जागेवर कब्जा न्याय दंडाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे.

    मिरज शहरात जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि हॉटेलचं बांधकाम पाडण्यात आलं होतं. बेकायदेशीररित्या जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेचा ताबा घेणे, नुकसान करणे, लोकांना मारहाण करणे आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी १२ कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    आता मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी करताना ब्रह्मानंद पडळकर यांना दणका दिला आहे. संबंधित जागेवर मिळकतदारांचा कब्जा आहे. आता पडळकर यांनी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असं न्यायालयाने म्हणत त्यांना फटकारलं आहे. मिरजेत रस्त्यालगतच असलेली दोन हॉटेल्स, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर आणि पान शॉप पाडण्यात आले होते. त्यानंतर संबंधित नागरिकांनी तक्रार दाखल केली होती.