ब्राह्मण, सीकेपी यांची स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार? राज्य सरकारकडून हालचालीना वेग; काय आहे प्रस्ताव?

ब्राह्मण, सीकेपींसह खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, या समजाला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार सदर समाजातील स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई- सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde fadnavis government) पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) अनेक महत्वाचे निर्णय व घोषणा होत असताना, आता ब्राह्मण व सीकेपी समाजासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दरम्यान, ब्राह्मण, सीकेपींसह खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, या समजाला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार सदर समाजातील स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अन्य महामंडळाच्या धरतीवर…

दरम्यान, राज्यातील विविध समाजासाठी विविध महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. जसे की, मराठा समाजासाठी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींसाठी महाज्योती संस्थेसह विविध योजनांच्या माध्यमातून युवक, महिला, उद्योजक व इतरांसाठी वेगवेगळय़ा पद्धतीने साहाय्य केले जाते. मात्र खुल्या गटासाठी मविआ सरकारने करोनाकाळात ही ‘अमृत’ संस्थेची स्थापना केली. मात्र हि संस्था यशस्वी ठरली नाहीय. त्यामुळं खुल्या प्रवर्गासाठी शासन स्वतंत्र्य महामंडळाची स्थापन करणार आहे.

ब्राह्मण-सीकेपीकडून महामंडळासाठी मागणी

राज्यात मराठा समाज, ओबीस समाज यांची महामंडळ व या समाजासाठी साह्य करणारी संस्था व महामंडळे आहेत, पण ब्राह्मण व सीकेपी तसेच खुल्या प्रवर्गासाठी अशा कोणत्याही संस्था व महामंडळ नाहीत, त्यामुळं या समजासाठी देखील महामंडळांची स्थापना व्हावी या मागणीला जोर धरु लागला होता. त्यानतर हा प्रश्न सभागृहात देखील उपस्थित करण्यात आला. त्यामुळं आता राज्य सरकार ब्राह्मण व सीकेपी तसेच खुल्या प्रवर्गासाठी महामंडळाची स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.