शिवशाहीचा ‘ब्रेक फेल’ पाच वाहनांना धडक; दोघे जखमी

पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेक निकामी झालेल्या शिवशाही बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले.

    पेठ वडगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेक निकामी झालेल्या शिवशाही बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले. ही घटना चारच्या सुमारास घडली.

    घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी–पुण्याहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या शिवशाही बसचा (एमएच ०७ सी ७१४६) किणी पथकर नाक्याजवळ आली असताना ब्रेक निकामी झाला. त्यामुळे पथकर देण्यासाठी उभारलेल्या कारला धडक बसली.

    त्यातील दोघेजण जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

    दोन गाड्या एकमेकांना धडकल्या

    शिवशाहीची कारला धडक बसल्यानंतर दाेन कारसह अन्य दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. या सर्व कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पथकर नाक्या जवळील गतीरोधक व चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीची गती कमी केल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताची नोंद वडगांव पोलिसात झाली आहे.