
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) काम पूर्णत्वाकडे जात असतानाच आता केंद्र सरकार रत्नागिरी (Ratnagiri) ते नागपूर (Nagpur) राष्ट्रीय महामार्गाचा एक ड्रीम प्रोजेक्ट हाती घेत आहे. भूसंपादनासाठी मिळणाऱ्या मोबदल्याबाबत या महामार्गाच्या परिसरात तीनशेपेक्षा तक्रारी झाल्याने २८९ कोटी रुपये रखडले आहेत.
मुंबई : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) काम पूर्णत्वाकडे जात असतानाच आता केंद्र सरकार रत्नागिरी (Ratnagiri) ते नागपूर (Nagpur) राष्ट्रीय महामार्गाचा एक ड्रीम प्रोजेक्ट हाती घेत आहे. भूसंपादनासाठी मिळणाऱ्या मोबदल्याबाबत या महामार्गाच्या परिसरात तीनशेपेक्षा तक्रारी झाल्याने २८९ कोटी रुपये रखडले आहेत.
भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी शिबिरे
राष्ट्रीय महामार्गाच्या गतिमान कामाला कोल्हापूर जिल्ह्यात ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापुरातील आंबा ते चौकापर्यंत भूसंपादनाचे काम सुरु आहे. यासाठी गावनिहाय भूसंपादनाचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी शिबिरे घेतली जात आहेत. भूसंपादन मोबदला प्रकरणात जिल्हा प्रशासनाला शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले तालुक्यातून ३१५ तक्रारी प्राप्त झाल्या.
४९ गावांमध्ये भूसंपादन
शाहूवाडी तालुक्यातील आहेत. त्यामुळे वादावर तोडगा निघाला नसल्यास ही रक्कम न्यायालय जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे. या महामार्गासाठी चार तालुक्यातील ४९ गावांमध्ये भूसंपादन केले जात आहे.