file photo
file photo

यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली असून, राहुल गांधींच्या दोन सभा देखील होणार आहे, यात्रेदरम्यान, चालताना "जातपात का बंधन तोडो...- भारत जोडो, भारत जोडो," असा नारा राहुल गांधींनी दिला आहे. दरम्यान, यावेळी भारतमाता की जय... "वंदे मातरम"... अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते.

    नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo yatra) महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. गुलाबी थंडीच्या वातावरणात हजारो पाऊले राहुल गांधींच्या मागे आणि पुढे कित्येक किलोमीटर पदयात्रेत चालत होती. सकाळी सहा वाजता पदयात्रा शंकरनगरहून नायगावच्या दिशेने निघाली. पुढे बँडपथक, मागोमाग पदयात्रा…! रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांच्या वेशीला, नाक्यांवर, चौका-चौकात कुटुंबेच्या कुटुंबे, शाळकरी मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोकही यात्रेच्या स्वागतासाठी उभे होते. गावागावातून क्षणाक्षणाला पदयात्रेत लोक सामील होत होते. सूर्य जसजसा वर येईल तसा यात्रेचा आकार वाढत होता. सात वाजेपर्यंत राहुल गांधींच्या मागे २ किलोमीटर आणि पुढे किमान ३ किलोमीटर माणसांची डोकी, सफेद सदरे दिसत होते.

    दरम्यान, ही यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली असून, राहुल गांधींच्या दोन सभा देखील होणार आहे, यात्रेदरम्यान, चालताना “जातपात का बंधन तोडो…- भारत जोडो, भारत जोडो,” असा नारा राहुल गांधींनी दिला आहे. दरम्यान, यावेळी भारतमाता की जय… “वंदे मातरम”… अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते. राहुल गांधींसोबत आठ-दहा वारकरी भजन, कोणी फुले घेऊन, कोणी झेंडे उंचवत, कोणी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत, मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाची विविधतेतून एकता दर्शवणारी विविध रंगी वेशभूषा…असे अनेक रंग सोबत घेऊन पदयात्रा निघाली होती.