bribery junior engineer in anti bribery department net bribe accepted from contractor

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी करून बुधवारी दुपारी धारणीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी राजेंद्र बोलके यांनी तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात (Dharni Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

    धारणी : सिमेंट रस्ता, नालीच्या कामाची पाहणी व मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी एका कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या धारणी पंचायत समितीच्या (Dharani Panchayat Samiti) कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Bribery Division) पथकाने बुधवारी दुपारी धारणीतील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील (Zilla Parishad Construction Sub Division) उपविभागीय अधिकारी कार्यालयातून अटक केली. राजेंद्र नथ्थुजी बोलके (५६) असे लाचखोर कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

    कंत्राटदाराने केलेल्या सिमेंट रस्ता व नालीच्या ३ लाख रुपयांच्या कामाची पाहणी व मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता राजेंद्र बोलके (Junior Engineer Rajendra Bolke) यांनी त्यांना २ टक्केप्रमाणे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत संबंधित कंत्राटदाराने २ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी करून बुधवारी दुपारी धारणीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला.

    त्यावेळी राजेंद्र बोलके यांनी तक्रारकर्त्या कंत्राटदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात (Dharni Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, देवीदास घेवारे, एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, नीलेश महिंगे, अभय वाघ, सतीश किटुकले आदींनी केली.